English | मराठी |  A
Mahatma Phule Krishi Vidyapeeth (Agriculture University), Rahuri
Dist.- Ahmednagar (M.S.)
                 

Contacts

Home / Contacts

Executive Council



महात्मा फुले कृषि विद्यापीठ

राहुरी - ४१३ ७२२, जि अहमदनगर( महाराष्ट्र राज्य)

कार्यकारी परिषद सदस्य
(महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम, १९८३ (सुधारणा २००३) मधील कलम ३०(१) अन्वये)
Sr.No. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ (सुधारणा २००३)मधील तरतूद प्रवर्ग कार्यकारी परिषद सदस्यांचे पूर्ण नाव व पत्ता संपर्क
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिनियम 1990 मधील परिनियम 31 अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये किंवा परिनियमाद्वारे विहित करण्यात येतील अशा शर्तीस परिषदेचे आणि राज्य परिषदेच्या पर्यवेक्षणास अधिन राहून कार्यकारी परिषदेस खालील अधिकार व कर्तव्य प्रदान करण्यात आले आहे

  1. विद्यापीठाकडे कोणते कार्यक्रम असावेत याची स्थूल रूपाने आखणी करणे;
  2. विद्यापीठाच्या वार्षिक अहवालावर चर्चा करणे आणि त्याचा आढावा घेणे व त्यावर सूचना करणे
  3. विद्यापिठाच्या वार्षिक वित्तीय अंदाजावर विचार करने होते तैयार करने अनित्यावर सूचना करने
  4. राज्य शासनाच्या मान्यतेने विद्यापीठ मालमत्तेच्या तारणावर विद्यापीठाच्या प्रयोजनांसाठी कर्ज घेणे
  5. परिनियमांस अधिन राहून विद्यापीठाच्या वतीने मृत्युपत्र दाणे, देणग्या आणि विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आलेली कोणतीही स्थावर किंवा जंगम मालमत्ता स्वीकारणे
  6. विद्यापीठाच्या वतीने कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्तेचे हस्तांतरण करणे
  7. विद्यार्थ्यांसाठी घटक महाविद्यालये, विभाग, वस्तीगृह, संशोधन केंद्र, कृषी क्षेत्रे, शाळा, ग्रंथालय, प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक केंद्र सुरू करणे व त्यांचे व्यवस्था पाहणे आणि कर्मचाऱ्यांना इतर सोयी पुरवणे
  8. विद्यापीठाचे आर्थिक व्यवहार, लेखे व गुंतवणूक यांची व्यवस्था ठेवणे व त्यांचे नियमन करणे;
  9. विहित करण्यात येईल त्याप्रमाणे फी व इतर खर्च निश्चित करणे, त्यांची मागणी करणे व ती स्वीकारणे;
  10. संशोधन कार्य चालविण्यासाठी आणि ज्ञानामध्ये प्रगती व त्याचा प्रसार यासाठी तिला योग्य वाटेल अशा ज्ञानशाखेतील आणि पाठ्यक्रमातील शिक्षण, अध्यापन व प्रशिक्षण यासाठी तरतूद करणे
  11. महाविद्यालये आणि पदव्युत्तर पतसंस्था यांच्या संलग्निकरणास मान्यता देणे;
  12. संलग्न महाविद्यालयांतील व मान्यता प्राप्त परिसंस्थेतील शैक्षणिक दर्जास मान्यता देणे व तो राखण्यात येत आहे याबद्दल खात्री करून घेणे;
  13. उच्च शिक्षण व संशोधन परिसंस्था यांना मान्यता देणे आणि त्यांची मान्यता काढून घेणे;
  14. पुढील गोष्टींसाठी तरतूद करणे

    अ. ग्रामीण जनतेचे विस्तार शिक्षण,

    ब. विद्यापीठाचे, संबंधित शासकीय विभागाचे आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी सेवेत असताना त्यांना प्रशिक्षण देणे,

    क. शारीरिक व लष्करी प्रशिक्षण देणे,

    ड. क्रीडा व व्यायाम मंडळे,

    ई. विद्यार्थ्यांचे कल्याण;

  15. संलग्न महाविद्यालयांच्या व मान्यताप्राप्त परिसंस्थांच्या तपासणीची व्यवस्था करणे व ती करण्याबद्दल निदेश देणे व त्यांचे कार्यक्षमता रहावी आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाच्या सेवेची खातर जमा करण्यासाठी म्हणून अनुदेश देणे आणि अशा अनुदेशांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यास, त्यांच्या संलग्न करण्याच्या किंवा मान्यता देण्यासंबंधीच्या शर्तीत फेरफार करणे विषयी किंवा तिला योग्य वाटेल अशी इतर उपाययोजना करण्याविषयी शिफारस करणे;
  16. संलग्न महाविद्यालय आणि मान्यता प्राप्त परिसंस्था यांतील कर्मचारी वर्गाची वेतन श्रेणी आणि त्यांच्या सेवेच्या शर्ती निश्चित करणे व त्यांचे पालन होत आहे यांची खात्री करून घेणे;
  17. परिनियम व विनयम करणे, त्यात सुधारणा करणे व त्यांचे निरसन करणे;
  18. विनियम स्वीकारणे, नाकारणे किंवा विद्या परिषदेकडे किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडे ते विचारार्थ परत पाठविणे;
  19. परीक्षक नेमणे, त्यांचे जर काही परिश्रमिक असल्यास, ते निश्चित करणे आणि विद्यापीठांच्या परीक्षा व इतर चाचणी परीक्षा घेण्याची व त्यांचे निकाल प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करणे;
  20. विद्यापीठ यथोचितरित्या चालावे म्हणून तिला आवश्यक वाटतील अशी, स्थायी किंवा तात्पुरती, मंडळे व समित्या नेमणे व त्यांची रचना, कामे आणि मुदत निश्चित करून देणे;
  21. तिला योग्य वाटतील अशा आपल्या अधिकारांपैकी कोणतेही अधिकार कुलगुरूस किंवा विद्यापीठाच्या किंवा तिने नेमलेल्या मंडळाच्या किंवा समितीच्या इतर अधिकाऱ्यांस परिनीयमाद्वारे प्रदान करणे;
  22. विद्यापीठाच्या सामायिक शिक्याचा नमुना ठरविणे व त्याची अभिरक्षा आणि त्याच्या वापराचे नियमन यासंबंधी तरतूद करणे;
  23. अधिछात्रवृत्त्या (प्रवासी अधिछात्रवृत्यांसह) शिष्यवृत्त्या, छात्रवृत्या, विद्यार्थीवेतने, पदके व पारितोषिके मंजूर करणे;
  24. पदवी, पदविका प्रमाणपत्रे व इतर विद्या विषयक विशेषोपाधी बहाल करण्यासंबंधी कुलपतीस शिफारस करणे;
  25. सन्मान्य पदव्या किंवा विद्याविषयक इतर विशेषोपाधि मंजूर करणे;
  26. विद्यापीठ व त्याच्या नियंत्रणा खालील महाविद्यालये व संस्था यांच्या विद्यार्थ्यांच्या व कर्मचारी वर्गाच्या गरजा भागवण्यासाठी ग्राहक सहकारी संस्थांसाठी तरतूद करणे;
  27. ह्या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये तिला प्रदान करण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करणे व तिच्यावर लादण्यात येतील अशी इतर कर्तव्ये पार पाडणे;
  28. ज्याकरिता या अधिनियमात किंवा परिणीयमात अन्यथा कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, अशा विद्यापीठाच्या सर्व अधिकारांचा व या अधिनियमाच्या किंवा परिणीयमांच्या उपबंधांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक आहेत अशा इतर सर्व अधिकारांचा वापर करणे.




Privacy Policy | Disclaimer | Committee | Linking Policy | Citizens Charter | Login
© 2019 Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri
Ahmednagar, Maharashtra-413722. India
Developed & Maintained by Agriculture Knowledge Management Unit, MPKV, Rahuri
Total Visitor :680771