English | मराठी |  A
Mahatma Phule Krishi Vidyapeeth (Agriculture University), Rahuri
Dist.- Ahmednagar (M.S.)
                 

Farmer

Home / Farmer / Farmer Scientist Forum

शेतकरी – शास्त्रज्ञ मंच


महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधन प्रक्रियेतून निर्माण झालेले सुधारित कृषि तंत्रज्ञान, शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या योग्य समन्वयातून प्रसारीत केले तर त्याचे अवलंबन शेतकरी स्तरावर मोठया प्रमाणावर होऊन कृषिविकासाला चालना मिळेल, याच संकल्पनेतून विस्तार कार्याला बळकटीकरण येण्यासाठी 11 ऑक्टोबर, 2005 पासून हाती घेतलेला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालये आणि कृषि तंत्र विद्यालये येथे एकुण 54 शेतकरी - शास्त्रज्ञ मंचाची स्थापना केली असून एकूण 1668 सभासद याचा लाभ घेत आहेत.


शेतकरी - शास्त्रज्ञ मंचाची उदिष्टये


  • कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ अधिकारी शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधून त्यांना मार्गदर्शन करणे.
  • शेतक-यांच्या आणि गावांच्या सर्वांगिण आर्थिक व सामाजिक विकासासाठी कृषि विद्यापीठामार्फत विविध योजना राबविणे.
  • विद्यापीठाने विकसीत केलेले संशोधीत तंत्रज्ञानाचा वापर करणेकरिता शेतक-यांना प्रवृत्त करणे.
  • शेतीविषयक परिस्थितीनुसार शेतक-यांकडून आलेल्या प्रश्नांची त्वरीत दखल घेऊन त्यानुसार संशोधनाचे नियोजन करणे.
  • मंचातील सभासदांच्या शेतीचा एक आदर्श निर्माण करणे त्याचे अनुकरण इतर शेतक-यांनी करणे बाबत प्रोत्साहन देणे.

शेतकरी - शास्त्रज्ञ मंचाचे कार्य


  • शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची महिन्यातून एकदा बैठक आयोजित करणे आणि हंगामनिहाय शेतक-यांचे प्रश्न सोडविणे.
  • विद्यापीठामार्फत घेण्यात येणा-या सर्व प्रात्यक्षिका मध्ये मंचाच्या सभासदाला प्राधान्य देणे.
  • मंचातील सभासद शेतक-यांची संपूर्ण माहिती प्रश्नावलीत भरुन तिचे विश्लेषण करुन मार्गदर्शन करणे.
  • मंचातील प्रत्येक सभासदराच्या जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करुन पीक पध्दती आणिखत मात्रा सुचविणे.
  • पिकांचे फिरते चिकित्सालय तज्ञ पथकासह मंचातील सभासदांच्या गावांना प्राधान्य देणे.
  • कृषि विद्यापीठातील आयोजित करण्यात येणा-या सर्वचर्चासत्रे / कृषि प्रदर्शने / मेळावे/ प्रशिक्षण / शिवार फेरीमध्ये मंचातील सभासदांना निमंत्रित करणे.
  • उत्पादित शेतमालाकरिता योग्य त्या बाजारपेठेची माहिती तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञानाबदल सभासदांना माहिती देणे.


शेतकरी - शास्त्रज्ञ मंच

संपर्क

व्यवस्थापक,
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ ,राहुरी जि.अहमदनगर-४१३७२२
फोन. नं.०२४२६ /२४३८६१, ई-मेल: aticmpkv@rediffmail.com



Privacy Policy | Disclaimer | Committee | Linking Policy | Citizens Charter | Login
© 2019 Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri
Ahmednagar, Maharashtra-413722. India
Developed & Maintained by Agriculture Knowledge Management Unit, MPKV, Rahuri
Total Visitor :591730