महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधन प्रक्रियेतून निर्माण झालेले सुधारित कृषि तंत्रज्ञान, शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या योग्य समन्वयातून प्रसारीत केले तर त्याचे अवलंबन शेतकरी स्तरावर मोठया प्रमाणावर होऊन कृषिविकासाला चालना मिळेल, याच संकल्पनेतून विस्तार कार्याला बळकटीकरण येण्यासाठी 11 ऑक्टोबर, 2005 पासून हाती घेतलेला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालये आणि कृषि तंत्र विद्यालये येथे एकुण 54 शेतकरी - शास्त्रज्ञ मंचाची स्थापना केली असून एकूण 1668 सभासद याचा लाभ घेत आहेत.